अयोध्येतील महंतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अयोध्येतील महंतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अयोध्येतील महंतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अयोध्येतील महंतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २ : अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रूघन दास आणि छबिराम दास महाराज यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्यासाठी निमंत्रित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात राज्यात सत्तांतर घडवून आणले. त्यांना प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असल्यानेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला यायला हवे, अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केली. या महंतांचे आपल्या निवासस्थानी स्वागत करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच त्यांच्या विनंतीला मान देऊन अयोध्येला येण्याचेदेखील कबूल केले. या भेटीवेळी खासदार राहुल शेवाळे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी आणि नाशिकचे नगरसेवक अजय बोरस्ते उपस्थित होते.