Fri, Jan 27, 2023

बोर्डीत पोस्टाचा कारभार ठप्प
बोर्डीत पोस्टाचा कारभार ठप्प
Published on : 3 January 2023, 11:28 am
बोर्डी, ता. ३ (बातमीदार) : केंद्र सरकारने पोस्टाच्या योजनांतून ग्राहकांना विविध आकर्षक सवलती देण्याच्या निर्णय घेतला आहे. पण अनियमित इंटरनेट सुविधा अद्ययावत नसलेल्या संगणक यंत्रणेमुळे बोर्डी परिसरातील पोस्टाचा कारभार ठप्प झाला आहे. बोर्डी पोस्ट कार्यालय अंतर्गत झाई, बोरीगाव, जांबुगाव, अस्वाली; तर घोलवड पोस्ट कार्यालयांतर्गत घोलवड आणि रामपूर या गावातील पोस्टाचा व्यवहार होतो. मात्र टपाल वाटपासाठी अपुरा कर्मचारी वर्ग व वारंवार विस्कळित होणारी इंटरनेट व्यवस्था यामुळे ग्राहकांची पोस्ट कार्यालयातील कामे विलंबाने होत आहे. तसेच ग्राहकांना पोस्टाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे इंटरनेट सेवा, संगणकीय यंत्रणा अद्ययावत करावी अशी मागणी ग्राहक करत आहेत.