कल्‍याणमध्‍ये १२७ दात्यांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्‍याणमध्‍ये १२७ दात्यांचे रक्तदान
कल्‍याणमध्‍ये १२७ दात्यांचे रक्तदान

कल्‍याणमध्‍ये १२७ दात्यांचे रक्तदान

sakal_logo
By

कल्याण, ता. ३ (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण येथे धर्मवीर आनंद दिघे यांची रक्‍तदान शिबिराची परंपरा अखंडपणे सुरू ठेवण्‍यात आली. रक्तानंद ग्रुपचे हे २८ वे वर्षे असून, मध्यरात्रीच्या शिबिरात १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांना गौरव चिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख विजय साळवी, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, ठाण्याचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, शहरप्रमुख सचिन बासरे, शरद पाटील, महिला शहर संघटक मीना माळवे आदि मान्यवर उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडता उपक्रम म्हणजे मध्यरात्री रक्तदानाने नववर्षाचे स्वागत. ही परंपरा आजतागायत अखंडपणे सुरू ठेवून शिवसेनेच्या निष्ठेची व स्वाभिमानी रक्तदात्यांचे संघटित बळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे दाखवून दिले, असे गौरवोद्गार ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख, रक्तानंदचे सरचिटणीस नारायण पाटील यांनी केले.