Sun, Feb 5, 2023

उचाटमध्ये ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व
उचाटमध्ये ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व
Published on : 3 January 2023, 11:39 am
वाडा, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील उचाट ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून असलेली प्रशासकीय राजवट हटवून ग्रामविकास आघाडी पॅनेलने आपला झेंडा रोवला आहे. यात नुकत्याच झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदी मानसी घोरकणे तर उपसरपंचपदी आशिष मोरे यांची निवड झाली आहे.
गेल्या १८ डिसेंबरला उचाट ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले होते. या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे सरपंच, उपसरपंचासह स्वाती मोरे, महेंद्र घोरकणे, संदीप पारधी हे सदस्य ही निवडून आले आहेत. गेली दहा वर्षे या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. पण आता प्रशासकीय राजवट दूर होऊन आता लोकशाही मार्गाने जनहिताची आता कामे करता येतील, अशी आशा नवनिर्वाचित उपसरपंच आशिष मोरे आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.