Sun, Feb 5, 2023

चांदिवलीच्या डीपी रोड संदर्भात आंदोलनाचा इशारा
चांदिवलीच्या डीपी रोड संदर्भात आंदोलनाचा इशारा
Published on : 3 January 2023, 12:20 pm
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) ः चांदिवलीतील नागरिक दररोज सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. चांदिवली फार्म रोड, खैराणी रोड आणि जेव्हीएलआर रोडवर अतिक्रमण झाले असून त्यामुळे या मार्गावर नेहमी कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने डीपी रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे; मात्र हा रस्ता पूर्ण झालेला नाही. त्यातच या काही मीटर बांधलेल्या रस्त्यावर आता मोटरसायकल आणि बीएमसीची कचऱ्याची वाहने उभी केलेली असतात. याबाबत चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी मनदीपसिंग मक्कड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनदीप सिंग यांनी दिला आहे.