बेशिस्त रिक्षाचालकांना दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त रिक्षाचालकांना दणका
बेशिस्त रिक्षाचालकांना दणका

बेशिस्त रिक्षाचालकांना दणका

sakal_logo
By

वाशी, ता. ३ (बातमीदार)ः प्रवाशांशी अरेरावीपणे वागणे, प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारणे, भाडे घेण्यास नकार देणे अशा विविध कारणांमुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये वादावादीचे प्रसंग अनेकदा उद्भवतात. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उचलून दणका दिला आहे.
नवी मुंबईतील बेशिस्त रिक्षाचालकांच्या वाढत्या तक्रारीमुळे त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. रिक्षाचालकांना खुले परमिट करण्यात आल्यामुळे रिक्षांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यात बेशिस्त रिक्षाचालकांचे प्रमाणदेखील खूप वाढले आहे. त्यामुळे अशा बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात आरटीओकडून कारवाईचा सपाटा लावला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ९०९ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील ४०३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यांच्याकडून ३१ लाख ३७ हजार ४५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत १,८७३ रिक्षाचालकांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली असून त्यातील ७७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यांच्याकडून ४८ लाख ८ हजार १५० रुपये दंड वसूल केला आहे.
------------------------------------------
आरटीओकडून रिक्षाचालकांवर वर्षभर कारवाई करण्यात येत असते, पण गतवर्षीपेक्षा या वर्षी रिक्षाचालकांची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. बेशिस्त रिक्षाचालकांना जरब बसावी, यासाठी कारवाई तीव्र करण्यात आली आहे.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई