उपसरपंचपदाची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंचपदाची निवड
उपसरपंचपदाची निवड

उपसरपंचपदाची निवड

sakal_logo
By

हारकोलच्या उपसरपंचपदी सुनील खेडेकर
माणगाव, ता.३ (बातमीदार) ः तालुक्यातील हारकोल ग्रामपंचायतीच्या महाविकास आघाडीच्या सरपंच फाईजा इस्तियाक हुर्जूक यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. त्यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निरीक्षक रवींद्र पवार व ग्रामसेवक भूपेश आयरे यांच्या उपस्थितीत हारकोलमध्ये उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.यात महाविकास आघाडीचे सुनील नामदेव खेडेकर विजयी झाले.
उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सुनील खेडेकर व रवींद्र काते या दोघांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर सोमवारी दुपारी २ वा. अर्जाची छाननी होऊन गुप्त मतदानाने निवडणूक घेण्यात आली. त्या वेळी दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ३ असे मतदान झाले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सरपंचांना आणखीन एक निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याने सरपंच फाईजा इस्तियाक हुर्जूक यांनी आपले मत सुनील नामदेव खेडेकर यांना दिल्याने उपसरपंचपदी सुनील खेडेकर विजयी घोषित करण्यात आले. सरपंचपदासहित ८ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी राजेश रमेश मोरे हे एकमेव सदस्य गैरहजर होते.
माणगाव ः हारकोलमध्ये उपसरपंचपदी सुनील खेडेकर निवडून आले.
................
प्रदीप घोसाळकर मांगरूळच्या उपसरपंचपदी
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यांतील सर्वच पक्षाचे प्रमुख नेत्यांचे वास्तव्य असलेल्या मांगरूळ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बाळासाहेबांची शिंदे गटाच्या शीतल योगेश वारीक सरपंचपदी निवडून आल्या आहेत. सोमवारी उपसरपंचपदी प्रदीप घोसाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
--------

पोलादपूरमध्ये दिविलच्या उपसरपंचपदी प्रमोद मोरे
पोलादपूर (बातमीदार) ः तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींपैकी ९ बिनविरोध झाल्या होत्या तर ७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. यात दिविल ग्रामपंचायत चर्चेत आली होती.
पैठण ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकहाती सत्ता असल्याने सरपंचपदी शीतल दत्ताराम येरूणकर तर उपसरपंचपदी अरूण दरेकर बिनविरोध करण्यात आली. दिविल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाचे सागर सखाराम देवे तर उपसरपंचपदी काँग्रसचे प्रमोद (पिंट्या) मोरे यांची निवड होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.

----------

दहिवलीत उपसरपंचपदी आदेश धुळे विराजमान
कर्जत (बातमीदार) ः तालुक्यातील प्रतिष्ठेची ठरलेल्या आणि सर्वांच लक्ष लागलेल्या दहिवली ग्रुप ग्रामपंचायतवर थेट सरपंचपदी निवडून आलेल्या शिंदे गटाच्या मेघा अमर मिसाळ यांनी कार्यभार हाती घेतला असून उपसरपंचपदी आदेश एकनाथ धुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या उपसरपंचपदाच्या उमेदवाराचा पराभव करत ग्रामविकास आघाडीने बाजी मारली आहे.
दहिवली ग्रामपंचायतमध्ये १५ वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता होती. पंरतु माजी पंचायत समिती सभापती अमर मिसाळ यांनी ही सत्ता उधळून लावत शिंदे गटाचा झेंडा ग्रामपंचायतवर फडकवला. येत्या काळात विकास कामांवर भर देणार असल्‍याचे मेघा मिसाळ यांनी सांगितले.
कर्जत ः
---------------------