आदर्श विकास मंडळाचा हिरक महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्श विकास मंडळाचा हिरक महोत्सव
आदर्श विकास मंडळाचा हिरक महोत्सव

आदर्श विकास मंडळाचा हिरक महोत्सव

sakal_logo
By

पालघर, ता. ३ (बातमीदार) : आदर्श विकास मंडळ रामबाग मंडळाकडून स्थापनेपासून ते आजपर्यंत सामाजिक शैक्षणिक, विद्यार्थी उपयोगी कार्यक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून राबवण्यात आले आहेत. परंतु आज विद्यार्थ्यांना वाचनालयाची गरज आहे. त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न करा, असे आवाहन सोनपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक विवेक कडू यांनी रामबाग येथे केले. रामबाग येथील आदर्श विकास मंडळ या मंडळाला साठ वर्षे पूर्ण झाली म्हणून हीरक महोत्सवाचा कार्यक्रम रामबाग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मंडळाचे माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सतीश म्हात्रे यांनी मंडळाच्या वाटचालीची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली म्हात्रे हिने, तर भरत चौधरी यांनी आभार मानले.