नवीन वर्षात हरवलेल्या मोबाईलची पोलिसांकडून भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन वर्षात हरवलेल्या मोबाईलची पोलिसांकडून भेट
नवीन वर्षात हरवलेल्या मोबाईलची पोलिसांकडून भेट

नवीन वर्षात हरवलेल्या मोबाईलची पोलिसांकडून भेट

sakal_logo
By

भाईदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा- भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयामार्फत नागरिकांना एक आगळी वेगळी भेट देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात मिरा रोड पोलिस ठाण्यात दाखल मोबाईल हरवल्याच्या तक्रारींपैकी पंधरा मोबाईल पोलिसांनी शोधून काढून ते संबंधित व्यक्तींना परत करण्यात आले. पोलिस स्थापना दिन सप्ताह निमित्त मिरा रोड पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधितांना देण्यात आले.
मिरा रोड पोलिस ठाण्यात गेल्या वर्षभरात बस, टॅक्सी, रिक्षा, दुकान या ठिकाणी विसरलेल्या अथवा हरवलेल्या मोबाईल फोनच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींपैकी सुमारे एक ते दीड लाख रुपये किमतीचे हरवलेले एकूण पंधरा मोबाईला शोधण्यात मिरा रोड पोलिस यशस्वी ठरले. हे मोबाईल पोलिस स्थापना दिन सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात परत करण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलिस आयुक्त विलास सानप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह बागल तसेच अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोबाईल हरवला अथवा चोरीला गेला असल्यास त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी त्याची तक्रार पोलिस ठाण्यात करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

महिला सुरक्षा व सक्षमीकरणावर मार्गदर्शन
पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलिसांच्या भरोसा सेलच्या अधिकाऱ्‍यांकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनींना महिला सुरक्षा व महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मिरारोड येथील एल. आर. तिवारी महाविद्यालयातील अभियांत्रिकी शाखेच्या सुमारे १५० विद्यार्थिनींशी सहाय्यक पोलिस निरिक्षक तेज‌श्री शिंदे, उपनिरीक्षक स्नेहल तांबडे तसेच त्यांच्या अन्य सहकाऱ्‍यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोणतीही अडचण असल्यास विद्यार्थिनींनी ११२ या हेल्पलाईनवर किंवा पोलिस ठाण्याचे नंबर, पोलिस काका, पोलिस दिदी यांच्या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.