
योगी आदित्यनाथ ५ जानेवारीला मुंबईत
मुंबई, ता. ३ ः फेब्रुवारीत होणाऱ्या परिषदेनिमित्त गुंतवणूकदारांना खेचण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ५ जानेवारी रोजी मुंबईत येणार आहेत. टाटा, रिलायन्स, गोदरेज यासह सुमारे १० बड्या प्रतिष्ठानांची ते व्यक्तिश: भेट घेणार आहेत. तसेच बॉलिवूडमधील काही निर्मात्यांनाही ते भेटणार आहेत.
उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक व्हावी, यासाठी योगींच्या मंत्रिमंडळातील आठ जण विदेश दौरा करुन आले आहेत. आता देशांतर्गत गुंतवणूकदारांशीही हे मंत्री संपर्क साधतील. योगी स्वत: मुंबईत दाखल होणार असून त्यांचे सहकारी पाच जानेवारीलाच दिल्ली, चेन्नई, कोलकाता अशा महत्वाच्या शहरात संपर्कासाठी जाणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत भेटीत उद्योगपतींची भेट होईल, असे पत्रकाद्वारे कळवले आहे. या दौऱ्यात राजकीय भेटीगाठी होणार आहेत का, ते समजू शकले नाही.