
एमआयडीसीत दोन दिवस पाणी नाही
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ विभागाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी जलवाहिनीवरील दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे एमआयडीसी विभागात पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
एमआयडीसीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत बारवी धरणाच्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस एमआयडीसी विभागाचा पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, तळोजा, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर तसेच नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात शुक्रवारपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी (ता. ७) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे संबंधित उद्योजकांसह व्यावसायिक तसेच या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन अंबरनाथ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत करण्यात आले आहे.