पनवेलवर तिसऱ्या डोळ्याची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलवर तिसऱ्या डोळ्याची नजर
पनवेलवर तिसऱ्या डोळ्याची नजर

पनवेलवर तिसऱ्या डोळ्याची नजर

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ४ (वार्ताहर)ः पनवेल शहर व परिसरातील गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे पोलिसांकडून तपासादरम्यान सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, सीडीआर या गोष्टींवर भर दिला जात असून शहरात चौकाचौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे ५० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पनवेल शहरात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर आता सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. शहर पोलिसांनी पनवेल शहरात जवळपास ३० हून अधिक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. शहरातील संपूर्ण मार्केटचा परिसर, जवेरी बाजार, कर्नाळा भाजी मार्केट, मुस्लिम नाका, टपाल नाका, शिवशंभू नाका, रेल्वे स्टेशन आधी परिसरात हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शोधण्यास पोलिसांना मदत होणार असल्याचे मत पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी व्यक्त केले. तसेच एखाद्या परिसरात गुन्हा घडल्यानंतर सर्व शासकीय व खासगी सीसीटीव्हीची तपासणी करून गुन्हेगारांचा माग काढला जात आहे.
-------------------------
शहरातील अनेक खून, मंगळसूत्र चोरी, जबरी चोरी, फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजचा पोलिसांना उपयोग होत आहे. ५० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांत आरोपीची ओळख पटवण्यात अथवा त्याचा माग काढण्यात यश आले आहे.
- विजय कादबाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल शहर