कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी महापालिका सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी महापालिका सज्ज
कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी महापालिका सज्ज

कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी महापालिका सज्ज

sakal_logo
By

विरार, ता. ४ (बातमीदार) : चीन, जपान या सारख्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही कोरोना नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार वसई-विरार महापालिका कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी शहरात आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
एकीकडे वसई-विरार शहर कोरोना मुक्त झाले असताना दुसरीकडे पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर भारतातही कोरोना रुग्ण वाढू नये, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही नियमावली जाहीर केली आहे. तसेच वसई-विरार महापालिकाही या कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी सज्ज झाली आहे. यासाठी ऑक्सिजन खाटा, नॉन ऑक्सिजन खाटा या पालिका रुग्णालयात सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णालयात बसविलेले ऑक्सिजन प्लांट हे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत. तर दुसरीकडे सरकारच्या नियमाप्रमाणे औषधाचा पुरेसा साठा, लसीकरण यावर भर दिला जात आहे. तसेच बूस्टर डोस न घेतलेल्यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जात आहे. तसेच १२ ते १४ वयोगटातील मुलांचे शिल्लक लसीकरण, इतर रुग्णालयातील खाटा, व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली.