अनधिकृत बांधकामांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामांवर कारवाई
अनधिकृत बांधकामांवर कारवाई

अनधिकृत बांधकामांवर कारवाई

sakal_logo
By

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग एक अंतर्गत राई गावात बांधण्यात आलेल्या अनधिकृत चाळीवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करुन हे बांधकाम उध्वस्त केले. या चाळीत तीन अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते.
आयुक्त दिलीप ढोले यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक विथ कमिशनर या उपक्रमांतर्गत भाईंदर पश्चिम येथील झोपडपट्ट्यांचा दौरा केला होता. त्यावेळी पदपथावर झालेले अतिक्रमण तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार भोला नगर झोपडपट्टीतील पदपथावर असलेल्या अठरा पत्र्याच्या शेड या पथकाने तोडल्या. त्याच बरोबर उत्तन येथील कत्तलखान्याचे आरक्षण असलेल्या जागेवरील पत्राशेड तसेच टर्फच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.