अनुष्का निंबाळकर आणि शिवम शेट्टी यांच्या प्रकल्पाची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुष्का निंबाळकर आणि शिवम शेट्टी यांच्या प्रकल्पाची निवड
अनुष्का निंबाळकर आणि शिवम शेट्टी यांच्या प्रकल्पाची निवड

अनुष्का निंबाळकर आणि शिवम शेट्टी यांच्या प्रकल्पाची निवड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिसाव्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये राज्य स्तरावर सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या अनुष्का निंबाळकर आणि शिवम शेट्टी यांची निवड झाली आहे. सिंघानिया शाळेतर्फे ‘समजूया झाडांचे शास्त्र, सोडवूया तणाचे रहस्य’ हा प्रकल्प सादर केला जाणार आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी आभासी पद्धतीने परिषदेचे उद्‍घाटन केले. या परिषदेमध्ये प्राथमिक फेरीत कनिष्ठ गटात महाराष्ट्रातून २२० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. या प्रकल्पांमधून दुसऱ्या फेरीसाठी ३३ प्रकल्पांची निवड करण्यात आली. या ३३ प्रकल्पांमधून १४ प्रकल्पांची निवड ही राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील ५ प्रकल्प असून सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी प्राचार्या रेवथी मॅडम आणि प्रकल्प मार्गदर्शक स्वाती प्रभू यांचे मार्गदर्शन लाभले.