म्हसा यात्रेसाठी गाव सज्‍ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हसा यात्रेसाठी गाव सज्‍ज
म्हसा यात्रेसाठी गाव सज्‍ज

म्हसा यात्रेसाठी गाव सज्‍ज

sakal_logo
By

मुरबाड, ता. ४ (बातमीदार) : गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारी म्हसोबाची यात्रा शुक्रवारी ६ जानेवारीपासून मुरबाडजवळील म्हसा गावी सुरू होत आहे. यात्रेसाठी दुकाने, मनोरंजनाची साधने दाखल झाली आहेत. यात्रेकरूंच्या संरक्षण व सुविधा पुरविण्यासाठी पोलिस, एसटी प्रशासन व ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.
म्हसा ग्राम पंचायत व खामलिंगेश्र्वर देवस्थान समितीतर्फे यात्रेवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येकी पंधरा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती म्हसा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शहाजी नरुटे यांनी दिली सरपंच सुवर्णा घागास, उपसरपंच विठ्ठल कुर्ले यांचे सर्व सदस्य कामाला लागले आहेत. आतापर्यंत दोन लोकनाट्य, आकाश पाळणे यांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतली आहे. पंचायतीने पाणीपुरवठा, आरोग्य तपासणी, सफाई, टीसीएल पावडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आग प्रतिबंधक उपकरणे ठेवण्याची दुकानदारांना सूचना देण्‍यात आली असल्‍याचे सांगण्यात आले. म्हसा ग्रामपंचायतीमार्फत १५ सीसी टीव्ही कॅमेरे व देवस्थानामार्फत १५ सीसी टीव्ही कॅमेरे यात्रेवर लक्ष ठेवणार आहेत. ग्रामपंचायती मार्फत २४ तास मदत कक्ष सुरू ठेवणार आहे. यात्रोत्‍सवासाठी सुमारे पाच ते दहा लाख यात्रेकरू येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यात्रेकरूंच्या सोईसाठी ५० जादा बस कल्याण-मुरबाड म्हसा मार्गावर धावणार आहेत. लोकांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसने प्रवास करावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.