तक्रारीची दखल घेण्याच पालिकेला आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तक्रारीची दखल घेण्याच पालिकेला आदेश
तक्रारीची दखल घेण्याच पालिकेला आदेश

तक्रारीची दखल घेण्याच पालिकेला आदेश

sakal_logo
By

विरार, ता. ५ (बातमीदार) ः कोरोनाच्या काळात नागरिकांना प्रत्यक्ष पालिका कार्यालयात येत येत नव्हते. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने मागील वर्षात ट्विटर अकाऊंटद्वारे नागरिकांपर्यंत पोचण्यास सुरुवात केली होती. याचा फायदा नागरिकांना होत आहे; मात्र तक्रारींचे निवारण होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नोंदवलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश कोकण विभागाच्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षाने दिले आहेत.

पालिकेकडून राबवण्यात आलेल्या योजना, विविध प्रकल्पांची माहिती ही नागरिकांपर्यंत पोचत नाही. यासाठी पालिकेने स्वतःचे ट्विटर या समाजमाध्यमावर अकाऊंट मागील वर्षी उघडले होते. यामार्फत विविध योजना तसेच समाजोपयोगी कामे आणि इतर माहिती नागरिकांपर्यंत पोहचत आहे; मात्र यावर केलेल्या तक्रारींची दखल पालिका घेत नसल्याची तक्रार आम आदमी पक्षाचे वसई विरार सहसचिव जॉय फरगोज यांनी केली आहे. पालिकेने याची दखल घ्यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज जॉय फरगोज यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षात सादर केला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मकरंद देशमुख यांनी महापालिकेला याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. पालिका स्तरावरून संबंधित तक्रार मुद्द्यावर योग्य ती चौकशी करून व शासनाच्या नियमानुसार तात्काळ कार्यवाही कार्यवाही करावी. तसेच अर्जदार यांना अंतिम अहवाल परस्पर कळवण्यात यावा आणि त्याची एक प्रत विभागीय आयुक्त यांना पाठवण्यात यावी, असे पालिकेला दिलेल्या पात्रात नमूद केले आहे.