परिचालकांची आमदार पाटील यांच्याशी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिचालकांची आमदार पाटील यांच्याशी भेट
परिचालकांची आमदार पाटील यांच्याशी भेट

परिचालकांची आमदार पाटील यांच्याशी भेट

sakal_logo
By

पालघर, ता. ५ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयात कंत्राटी पद्धतीने संगणक परिचालक काम करीत असतात; मात्र कामाचा मोबदला त्यांना अपुरा मिळतो. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला कायम नोकरी मिळावी व मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे गेले होते. यासाठी आमदार राजेश पाटील यांनी परिचालकांची सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे या परिचालकांनी आमदार पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

नागपूर येथे सर्व परिचालकांची सर्व ती व्यवस्था बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी केली होती. परिचालकांच्या आंदोलनात आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांची विचारपूस करून त्यांची राहण्याची-भोजनाची व्यवस्थाही केली होती. ते सतत आंदोलकांच्या संपर्कात होते. या अनुषंगाने आमदार राजेश पाटील यांचे आभार मानण्यासाठी पालघर जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ४ जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आभार मानले. या वेळी संघटनेचे धनेश्वर भोईर, प्रियांका किनी, प्रीतम गवारी, पंकज गायकर, रंजना चावरे, तनुजा पाटील आदी उपस्थित होते.