सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

मुरबाड, ता. ५ (बातमीदार) ः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी मुरबाड तालुक्यातील पारगाव येथे व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सावित्रीबाई जोतिबा फुले यांचे जीवनकार्य या पुस्तिकेचे वाटप मीनाक्षी सुब्रमण्यम मेमोरियल फाऊंडेशन आणि इंडियन लायब्ररी काँग्रेस यांच्या साह्याने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बुक्टू या प्राध्यापक संघटनेच्या सदस्या आणि प्राध्यापिका डॉ. माधवी निकम व प्रा. सुज्जू गुजर या उपस्थित होत्या होत्या.

मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका व माजी सिनेट सदस्या डॉ. मधु परांजपे यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य आणि महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनी आणि महिलांसाठी निबंध स्पर्धेचे व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरपंच डॉ. कविता वरे-भालके, उपसरपंच चित्रा अरुण ठाकरे, ग्रामसेवक ललिता पवार, रत्ना पडवळ, सुनीता भालके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबळे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सरपंच डॉ. कविता वरे-भालके व ग्रामपंचायत किसळ-पारगाव यांनी केले होते.