केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

sakal_logo
By

वाडा, ता. ५ (बातमीदार) ः तालुक्यातील बिलोशी केंद्र शाळेच्या वतीने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन गौरापूर जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते. या स्पर्धेत चार उच्चस्तरीय, तर ११ प्राथमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. सदर स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटांत घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळात प्रावीण्य मिळवता यावे यासाठी लंगडी, खो-खो, कबड्डी, लांब उडी, १०० मीटर धावणे, संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभास जिल्हा परिषद सदस्या मिताली बागुल, बिलोशी केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन जव्हारकर, शिक्षक व पालक उपस्थित होते.