‘मेट्रो’ची लोखंडी प्लेट अंगावर पडून महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मेट्रो’ची लोखंडी प्लेट अंगावर पडून महिलेचा मृत्यू
‘मेट्रो’ची लोखंडी प्लेट अंगावर पडून महिलेचा मृत्यू

‘मेट्रो’ची लोखंडी प्लेट अंगावर पडून महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ (वार्ताहर) : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामात खांबाला लावलेली लोखंडी प्लेट अंगावर पडून भंगारवेचक महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील उत्सव हॉटेलसमोर घडली. सुनीता कांबळे (३७, लोकमान्यनगर-ठाणे) असे या महिलेचे नाव आहे. ठाण्यात मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. या कामाकरिता खोदलेल्या खड्ड्यामध्ये खांबाची उभारणी सुरू आहे. यात खांबाच्या आधारासाठी लावलेली लोखंडी प्लेट तेथे भंगार वेचणाऱ्या सुनीता यांच्या अंगावर पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, राबोडी पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत महिलेलाचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला.