Tue, Feb 7, 2023

कसाऱ्यात तरुणीचा मृतदेह सापडला
कसाऱ्यात तरुणीचा मृतदेह सापडला
Published on : 5 January 2023, 3:09 am
खर्डी, ता. ५ (बातमीदार) : कसाऱ्याजवळील करंजपाडा रस्त्यावर गुरुवारी दुपारी २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. स्थानिक रहिवाशाला हा मृतदेह दिसताच त्याने पोलिस पाटील सुनील वाघचौडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कसारा पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक संदीप गीते व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. तरुणीच्या कानाजवळ धारदार हत्याराने वार केल्याचे आढळल्याने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी पंचनामा करून तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहापूर येथील रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.