Fri, Jan 27, 2023

भिवंडीत चार गोदामांना आग
भिवंडीत चार गोदामांना आग
Published on : 5 January 2023, 3:45 am
भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : तालुक्यातील ओवळी गावात मिनी पंजाब हॉटेलजवळ सागर कॉम्प्लेक्समधील ट्रॅव्हल बॅग बनविणाऱ्या चार गोदामांना आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशमन दल आणि खासगी पाच वॉटर टँकरच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ओवळी गावातील गोदामात बॅग बनविण्याचा कच्चा माल व तयार मालाचा साठा होता. आज सकाळी लागलेल्या आगीत बॅगसह मशिनरी जाळून खाक झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी कारखान्याच्या मागील भिंतींना मोठे भगदाड पाडावे लागले. त्यामधून पाण्याचा प्रवाह आत सोडून आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.