विरारजवळील कांदळवनात जैवविविधतेचे कोंदण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारजवळील कांदळवनात जैवविविधतेचे कोंदण
विरारजवळील कांदळवनात जैवविविधतेचे कोंदण

विरारजवळील कांदळवनात जैवविविधतेचे कोंदण

sakal_logo
By

संदीप पंडित ः विरार
वसई-विरार परिसरतील कांदळवन जैवविविधेतेने नटलेले आहे. यात विविध प्रकारचे पक्षी, मासे आपले अस्तित्व टिकवून आहेत. तसेच येथे तिवरांच्या जंगलासह पांढरी चापी, सोन चाप, झुंबर आदी प्रकारचे वृक्ष आढळतात. यामुळे येथील कांदळवनाला जैवविविधतेचे कोंदण लाभले आहे.
कांदळवने हे समुद्र जीवसृष्टीचा अविभाज्य भाग आहे. त्याचा फायदा विविध पक्षी, मासे यांना होत असतो. याचा विचार करून सरकारने कांदळवनांच्या संवर्धनासाठी अनेक पावले उचलली आहेत. पालघर जिल्हा हा निसर्गसंपन्नतेने नटलेला जिल्हा आहे. एका बाजूला किनारपट्टी; तर दुसऱ्या बाजूला उंचच उंच डोंगर. धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे यामुळे मुंबईसह आसपासच्या भागातून पर्यटक येथे येत असतात. आता यालाच जोडून सरकारने कांदळवन निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून किनारपट्टीवरील गावांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या योजना आखल्या आहेत. त्यानुसार विरार पश्चिमेपासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर मरंबल पाडा येथून कांदळवन सफारी बोट सेवेमार्फत करता येणार आहे. याद्वारे ओहोटीच्या वेळी कांदळवन आणि त्याभोवती असणाऱ्या जैवविविधतेसह विविध सागरी जीव-जीवाणू, पक्षी, विविध मासे नागरिकांना बघता येणार आहेत.
...
विविध पक्ष्यांसह कोल्हा, लांडगा पाहण्याची संधी
वसईतील पक्षीप्रेमी आणि वन्यजीव छायाचित्रकार स्वप्नील नाईक हे कांदळवनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून बोट सफारी आयोजित करतात. बोट सफारीदरम्यान करडा बगळा, मोठा आणि छोटा बगळा, ढोकर, सीगल, ग्रीन शांक, कॉमन संडपायपर, प्लोवर, आयबीस, छोटा आणि मोठा धिवर यासह अनेक पक्ष्यांचे दर्शन घडते. याच तिवराच्या जंगलामध्ये कोल्हा आणि लांडगा आपला अधिवास टिकवून आहे, त्यांचेही दर्शन या सफारीतून घडते.