डॉ. ॲड. संतोष सावंत यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. ॲड. संतोष सावंत यांना ‘समाजरत्न पुरस्कार’
डॉ. ॲड. संतोष सावंत यांना ‘समाजरत्न पुरस्कार’

डॉ. ॲड. संतोष सावंत यांना ‘समाजरत्न पुरस्कार’

sakal_logo
By

मालाड, ता. ७ (बातमीदार) डॉ. ॲड. संतोष देवजी सावंत यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दादर येथील हॉटेल कोहिनूर पार्क येथे ऊर्जा फाऊंडेशन आणि आरोग्य भारती यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सावंत यांना आरोग्य भारती संस्थेचे सचिव आणि आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. अशोक कुमार वार्ष्णेय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी न्यायाधीश स्नेहा सचिन म्हात्रे, डॉ. संतोष पांडे, डॉ. सुनील खन्ना, डॉ. विजय जंगम स्वामी, डॉ. वैभव देवगिरीकर, डॉ. दीपक देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.