
भाजपच्या कार्यकर्त्या आशा बक्षी आम आदमी पक्षात
कांदिवली, ता. ७ (बातमीदार) ः भाजपच्या कार्यकर्त्या आशा बक्षी यांनी भाजपला रामराम ठोकून आम आदमी पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. आम आदमी पक्षाच्या मुंबई प्रदेश कमिटी अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या उपस्थितीत आशा बक्षी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तसेच काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनीही आम आदमी पक्षात प्रवेश केला. या वेळी त्यांचे स्वागत करताना या सर्वांना चांगले काम करण्याची संधी मिळेल, आमचा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात आहे, असे मेनन यांनी सांगितले.
दहिसर पश्चिम येथील मैत्री बँक्वेट हॉल येथे झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात बक्षी यांना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व मुंबई अध्यक्ष या पदाची जबाबदारी देण्यात आली. आशा बक्षी यांनी आपल्या भाषणात आम आदमी पार्टीचे काम अधिक जोमाने करण्याचे ठरवले असून इतर अनेक पक्षांचे कार्यकर्ते माझ्या संपर्कात असल्याचा दावाही केला.