मांजरीच्या पिल्लाची सुखरुप सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांजरीच्या पिल्लाची सुखरुप सुटका
मांजरीच्या पिल्लाची सुखरुप सुटका

मांजरीच्या पिल्लाची सुखरुप सुटका

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ : ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसच्या इंजिनमध्ये अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची तब्बल एक तासाने सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना यश आले. त्यानंतर बसचालक-वाहकांसह सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. ठाणे महानगरपालिकेच्या आनंद नगर डेपोच्या बसच्या इंजिनमध्ये मांजरीचे पिल्लू ब्रह्मांड बस स्टॉपजवळ अडकल्याची बाब चालक विकास खरात आणि वाहक अक्षय शिंदे यांच्या निदर्शनास आली. याबाबत तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सांगण्यात आले. ही माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्या अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले; मात्र ते पिल्लू इंजिनमधून बाहेर येत नव्हते. अखेर एक तासाच्या प्रयत्नांनंतर बसच्या इंजिनमध्ये अडकलेल्या मांजरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात आली.