
मुरबाड येथील तलावाचा नामकरण सोहळा थाटात
मुरबाड, ता. ७ (बातमीदार) : मुरबाड शहरातील शास्त्रीनगर येथील तलावाच्या कमानीचा नामकरणाचा उद्घाटन सोहळा मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला. तलावाला महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. या तलावाला नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यास विरोध झाल्याने गेले काही महिने हे नामकरण थांबले होते. अखेर मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, उपनगराध्यक्ष मानसी देसले यांच्य पुढाकाराने नामकरण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. कार्यक्रमास मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य उल्हास भाऊ बांगर, मुरबाड पंचायत समितीच्या सभापती स्वरा चौधरी, माजी सभापती दीपक पवार, नगरसेवक नितीन तेलवणे, संतोष चौधरी, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे, भाजप तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, लियाकत शेख, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.