ठाण्यात थंडीतही स्विमिंग क्रेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात थंडीतही स्विमिंग क्रेज
ठाण्यात थंडीतही स्विमिंग क्रेज

ठाण्यात थंडीतही स्विमिंग क्रेज

sakal_logo
By

चैताली वर्तक, ठाणे
सध्याच्या धावपळीच्या जगात व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पण व्यायाम म्हटले की काही लोकांना खूप कंटाळा येतो, तर काही लोक नवीन वर्षाची सुरुवात म्हणून व्यायामाला सुरुवात करतात, पण काही दिवसांनंतर त्याचा कंटाळा करतात. अशात स्विमिंग हा असा व्यायाम आहे की जो कितीही केला तरी कंटाळा येत नाही. यामुळे ठाण्यात ऐन थंडीतही स्विमिंग क्रेज वाढत आहे.
ठाण्यातील बहुतांश नागरिकांनी व्यायामासाठी स्विमिंग हा पर्याय निवडला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील मारोतराव शिंदे जलतरण तलाव येथे ८० हून अधिक ज्येष्ठ नागरिक, ६०० लहान मुले, तर एक हजारांहून अधिक पुरुष आणि महिलांनी नोंदणी केली आहे. गडकरी रंगायतन येथे सकाळी ६ ते १० व संध्याकाळी ३ ते ९ वाजेपर्यंत स्विमिंग बॅच घेतल्या जातात. यामध्ये सकाळच्या वेळेत ज्येष्ठ नागरिक दररोज स्विमिंगसाठी येतात, तर दुपारी महिला स्विमिंगसाठी येतात, असे जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका रिमा देवरूखकर यांनी सांगितले.
वयाच्या ५० वर्षांनंतर माणसाला गुडघेदुखी, हात-पाय दुखणे असे अनेक आजार बळावतात, पण ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक या समस्यांवर मात करण्यासाठी दररोज सकाळी पोहायला जात आहेत. यामुळे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत, असे पोहण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. तसेच दुपारच्या वेळात घरातील कामे उरकून महिला आपल्या मुलांसह येथे स्विमिंग करण्यासाठी येतात. मुलांना स्विमिंग शिकवताना स्वतःही स्विमिंग करत येत असल्याने येथे महिलांचे प्रमाणही वाढले आहे.