Tue, Feb 7, 2023

शहापुरात वीजचोरीविरोधात धडक कारवाई
शहापुरात वीजचोरीविरोधात धडक कारवाई
Published on : 7 January 2023, 11:58 am
खर्डी, ता. ७ (बातमीदार) : महावितरणचे शहापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कट्टकवार यांच्या नेतृत्वाखाली २१ वीजचोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख ४७ हजार ६७७ युनिटची चोरी पकडण्यात आली आहे. शहापूर तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने तपासणी केली असता शहापूर, वासिंद, डेहणे, नडगाव, गुडे, शेणवे, धसई, कळमगाव, आसनगाव, कसारा व किन्हवली या विभागात वीजचोरी आढळून आली. वीजचोरीप्रकरणी २१ वीज ग्राहकांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत २६ लाख ७३ हजार ६०० रुपयांची चोरी पकडण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना वीजचोरीची बिले अदा केल्यानंतरही बिले भरली नाहीत अशा ग्राहकांवर विद्युत कायद्यानुसार पोलिस ठाणे मुरबाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.