वेदांत रुग्णालयातर्फे पत्रकारांना हेल्थ कार्डवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेदांत रुग्णालयातर्फे पत्रकारांना हेल्थ कार्डवाटप
वेदांत रुग्णालयातर्फे पत्रकारांना हेल्थ कार्डवाटप

वेदांत रुग्णालयातर्फे पत्रकारांना हेल्थ कार्डवाटप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : पत्रकार दिनानिमित्त ठाणे महापालिका पत्रकार कक्षात ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नरेंद्र बल्लाळ सभागृहात वेदांत रुग्णालयाच्या वतीने पत्रकारांना मोफत उपचारांसाठी हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ठाणे पालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे, कार्याध्यक्ष विकास काटे आणि वेदांत रुग्णालयाचे संचालक अजय सिंग यांच्या हस्ते आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले. या वेळी उपायुक्त जोशी यांनी ठाणे पालिकेने पत्रकार कल्याण निधीसाठी केलेली एक कोटींची तरतूद कशा प्रकारे कार्यान्वित करता येईल, याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप शिंदे यांनी केले.