उद्यानात नशेखोरांचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यानात नशेखोरांचा वावर
उद्यानात नशेखोरांचा वावर

उद्यानात नशेखोरांचा वावर

sakal_logo
By

खारघर, ता.८ (बातमीदार): तळोजा सेक्टर १४ मधील उद्यानात मॅार्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना औषधाने भरलेली आठ ते दहा इंजेक्शन आढळून आले आहेत. यामुळे उद्यानात रात्रीच्या वेळी ड्रग्जचे सेवन केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
तळोजा वसाहतीत सेक्टर नऊ आणि चौदा हे दोन उद्यान सिडकोने विकसित केली आहे. काही महिन्यापूर्वी सेक्टर चौदामधील उद्यानात बिअरच्या बॉटल तशाच ठेवून मद्यपी पसार झाल्याचा प्रकार घडला होता. तर काही ठिकाणी उद्यानाचे लोखंडी गेट देखील चोरट्यांनी पळवले आहेत. त्यामुळे या मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढला आहे. दरम्यान, रविवार सकाळी मॅार्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना उद्यानातील एका कोपऱ्यात औषधांनी भरलेल्या आठ ते दहा सुई इंजेक्शन आढळून आले आहेत. त्यामुळे उद्यानात ड्रग्जचे सेवन होत असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. यावेळी उद्यानात सापडलेल्या औषधांची माहिती सोशल मीडियावर नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवणार असल्याची माहिती डॉ. संतोष राठोड यांनी दिली आहे.
----------------------------------
गांजा सेवनाच्या प्रकारांत वाढ
सेक्टर दहा येथील खेळाच्या मैदानात काही दिवसापूर्वी सिगारेटद्वारे गांजामधून नशा करणाऱ्या दोघा तरुणांकडे विचारणा केली असता, तळोजा आणि पापडीचा पाडा परिसरात गांजा उपलब्ध होत असून मद्यप्राशन करण्याऐवजी गांजासेवन करून नशा करीत असल्याचे सांगितले.