पालघर जिल्ह्याला १६२ पदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्याला १६२ पदके
पालघर जिल्ह्याला १६२ पदके

पालघर जिल्ह्याला १६२ पदके

sakal_logo
By

विरार, ता. ८ (बातमीदार) : खेलो मास्टर गेम ही राज्यपातळीवरील स्पर्धा अहमदनगर, कोकमठाण येथे आत्मा मालिक इंतरनॅशनल स्कूल येथे पार पाडली. खेलो मास्टर गेमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शितिज ठाकुर व पालघर जिल्ह्याचे राजिवा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडली. खेलो मास्टर गेममध्ये राज्यपातळीवर खेळवण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये एकूण १३ खेळांचा समावेश होता. ॲथेलेटिक्स, कुस्ती, स्वीमिंग, रायफल शुटींग तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस असे विविध सांघिक खेळ खेळवण्यात आले. यामध्ये पालघर जिल्ह्याने १२८ सुवर्णपदके, ३० सिल्व्हर पदके आणि १४ कास्य अशी एकूण १६२ पदके मिळवली आहेत.