नेरळ विद्या विकास शाळेत चिमुकल्यांची पावले थरकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरळ विद्या विकास शाळेत चिमुकल्यांची पावले थरकली
नेरळ विद्या विकास शाळेत चिमुकल्यांची पावले थरकली

नेरळ विद्या विकास शाळेत चिमुकल्यांची पावले थरकली

sakal_logo
By

चिमुकल्यांची पावले थरकली
नेरळ विद्या विकास शाळेतील विद्यार्थ्यांनी उडवली धमाल

कर्जत, ता. ९ (बातमीदार) : काही वर्षांपूर्वी नेरळ येथे सुरू केलेल्या छोट्या विद्या विकास मंदिर शाळेचे आता वटवृक्षात रूपांतर झाले याचा आनंद होत आहे, असे कौतुकोद्‍गार विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री राजेंद्र पवार यांनी काढले. ते शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने प्राथमिक विभागातील आदर्श शिक्षिका म्हणून दीपाली पवार आणि आदर्श कार्यालयीन कर्मचारी माधुरी सुर्वे आणि आदर्श सेविका सुवर्णा मगर यांना सन्मानित करण्यात आले.
प्राथमिक विभागातील स्नेहसंमेलनात पहिले नमन गणपती आला नी नाचून गेला हे गणेश वंदन गीत सादर करण्यात आले. त्यानंतर मागील दोन वर्षे आपला देश ज्या संकटाला सामोरे जात होते, त्या कोविडवर आधारित वैद्यकीय क्षेत्राला आणि आरोग्य खात्याला सलाम करणारे गाणे विद्यार्थ्यांनी सादर केले. अलिबागची आठवण झाली की नजरेसमोर येतो तो समुद्र, पाण्यातील किल्ला आणि नारळी पोफळीच्या बागा. त्याच माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला या गाण्यावर विद्यार्थ्यांनी बेधुंद होऊन नाचले. खंडोबाचे कारभारीन झाली, बानु धनगरीन, हे मार्तंड खंडोबा यांचे गाणे विद्यार्थ्यांनी सादर केले. लावणी सादर करताना चंद्रा लावणी, फिर भी दिल है हिंदुस्थानी, दादी अम्मा दादी अम्मा, युगे युगे विटेवरी; तसेच झुलवा पाळणा या गीतानंतर भारतरत्न गान कोकिळा लता दीदी यांची आठवण करून देणारी गाणी सादर केली. त्यावर विद्यार्थी कलाकारांनी नृत्य सादर केले. आपली यारी या गाण्यानंतर एकमेकांना साह्य करू, अवघे धरू सुपंथ हे नाटक कलाकारांनी सादर केले. त्याच वेळी आजच्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनलेला सोशल मीडिया, मायभवानी, नाचो नाचो, फादर्स डे आणि कोळीगीतांच्या रिमिक्स गाण्यांनी या स्नेहसंमेलनात रंगत आणली.