पश्चिम रेल्वेवर चार दिवसांचा विशेष ब्लॉक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेवर चार दिवसांचा विशेष ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर चार दिवसांचा विशेष ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर चार दिवसांचा विशेष ब्लॉक

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते डहाणू रोड स्थानकांदरम्यान ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी तब्बल चार दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ९, ११, १२ आणि १३ जानेवारीला घेण्यात येणार असल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी वाणगाव ते डहाणू रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ९, ११ आणि १२ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ ते १०.४५ वाजेपर्यंत आणि १३ जानेवारीला सकाळी १०.२० ते ११.२० वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सकाळी ७.५१ वाजता सुटणारी अंधेरी-डहाणू रोड आणि सकाळी ७.४२ ची चर्चगेट ते डहाणू रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. त्याशिवाय रेल्वे क्रमांक १२९३४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस ३५ मिनिटे, रेल्वे क्रमांक २०४८३ भगत की कोठी-दादर सुपरफास्ट एक्स्प्रेस ४० मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वतीने देण्यात आली.