भारती विद्यापीठाचा खो-खो संघ राष्ट्रीय स्पर्धेत विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठाचा खो-खो संघ राष्ट्रीय स्पर्धेत विजयी
भारती विद्यापीठाचा खो-खो संघ राष्ट्रीय स्पर्धेत विजयी

भारती विद्यापीठाचा खो-खो संघ राष्ट्रीय स्पर्धेत विजयी

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : राष्ट्रीय अखिल भारतीय वनवासी कल्याण स्पर्धा सोनभद्र उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये यामध्ये १६ वर्षांखालील मुली व १४ वर्षांखालील मुलांसाठी खोखो स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्र कोकण प्रांत या संघाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून विक्रमगड तालुक्यातील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल येथील ६ मुले व ४ मुली सहभागी झाले होते. मुलींच्या संघामध्ये पुनम तुंबडा, धनश्री भोरे, चंदना थोरात, चेतना खांजोडे; तर मुलांच्या संघामध्ये तन्मय गोवारी, तन्मय थेतले, अभिजीत तारवी, प्रतिक रडे, अभिजीत खोडे, जय गवळी, आदी खेळाडूंचा सहभाग होता. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोच म्हणून भारती विद्यापीठ इंग्लीश मिडीयमचे क्रीडाशिक्षक अविनाश भुसारा यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.