ठेकेदारांच्या कामाचे थकित पैसे द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठेकेदारांच्या कामाचे थकित पैसे द्या
ठेकेदारांच्या कामाचे थकित पैसे द्या

ठेकेदारांच्या कामाचे थकित पैसे द्या

sakal_logo
By

कल्याण, ता. ९ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली ठेकेदार वेल्फेअर असोसिएशनचे जवळपास २०० छोटे-मोठे ठेकेदार सदस्य आहेत. त्यांना पालिकेच्या विविध विभागांतील डिसेंबर २०२१ पासून केलेल्या कामांच्या बिलांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ठेकेदार आर्थिक संकटात असून ठेकेदारांना न्याय द्यावा, असे साकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना घातले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत विविध विभागांत काम करणाऱ्या ठेकेदारांना २०२१ च्या डिसेंबर महिन्यापासून केलेल्या कामांचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. यासाठी ठेकेदार पालिका आयुक्त ते मुख्य लेखाधिकारी व वित्त अधिकारी यांची भेट घेत असतात; परंतु त्यांच्याकडून नेहमीच महानगरपालिकेकडे पैसे नसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक वेळा अधिकारी आश्वसन देतात; मात्र त्यांची पूर्तता न झाल्याने ठेकेदार आर्थिक संकटात आहेत.

-----------------
कर्जबाजारीपणामुळे मानसिक तणाव
कल्याण-डोंबिवली ठेकेदार वेल्फेअर असोसिएशनचे आशुतोष येवले, कालिदास कदम, गणेश पाटील, नितीन बुडूक, विलास बागड आदींच्या शिष्टमंडळाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणे कल्याण-डोंबिवलीमधील ठेकेदारांची अवस्था झाली असून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. बिलाचे पैसे न दिल्याने अनेक जण मानसिक तणावात असल्याचे निवेदनात व्यक्त केले आहे.