Fri, Feb 3, 2023

थेलेसेमियाग्रस्त मुलांसाठी रक्तदान शिबिर
थेलेसेमियाग्रस्त मुलांसाठी रक्तदान शिबिर
Published on : 9 January 2023, 9:01 am
भांडुप, ता. ९ (बातमीदार) ः थेलेसिमिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या रुग्णांमध्ये बालकांचे प्रमाण जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर भांडुप पश्चिम स्टेशन परिसरात सर जे. जे. महानगर रक्तपेढी मुंबई आणि मनसे रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना प्रभाग संघटक संतोष पार्टे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ८) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात विविध सामाजिक संस्था, महापालिका कर्मचारी, पोलिस, पत्रकार आणि अनेक जागरूक नागरिक सहभागी झाले. या वेळी रक्तसंकलनाच्या ११४ पिशव्या रक्तपेढीला देण्यात आल्या.