मॅरेथॉन स्पर्धेत धावले चिमुकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅरेथॉन स्पर्धेत धावले चिमुकले
मॅरेथॉन स्पर्धेत धावले चिमुकले

मॅरेथॉन स्पर्धेत धावले चिमुकले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : रेझिंग डे, रस्ता सुरक्षा अभियान डोंबिवली आणि जय मल्हार विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण आठ गटांत एक ते पाच किलोमीटर अशी ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. प्रभागातील अनेक चिमुकल्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेत बक्षिसांची लयलूट केली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, हर्षद पाटील, अनिल वलेकर तसेच कल्याण व कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पूर्वेतील एमएससीबी ऑफिससमोरील घरडा कॉलनी येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली.