मेर्दी गावाला पाणीयोजनेची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेर्दी गावाला पाणीयोजनेची भेट
मेर्दी गावाला पाणीयोजनेची भेट

मेर्दी गावाला पाणीयोजनेची भेट

sakal_logo
By

ठाणे, ता. ९ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात मेर्दी गावाला नळ पाणीयोजनेची भेट मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रयत्नांमुळे गावाला आता नळाद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे. मुरबाड तालुक्यातील मेर्दी ग्रामपंचायतीच्या हद्दीत धारखिंड व बांडेशीत परिसरातील ग्रामस्थांची तहान वर्षानुवर्षे विहिरीवर भागत होती. मात्र, लोकसंख्या वाढल्यानंतर विहिरीतील पाणी कमी पडू लागले. उन्हाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत होती. या गावातील लोकप्रतिनिधी व काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांना ही व्यथा सांगितली. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेत धारखिंड व बांडशित गावाचा समावेशाबाबत उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी प्रयत्न केले. त्यानंतर या योजनेला मंजुरी मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात ग्रामस्थांसाठी हा दिवस सुवर्णदिन ठरला. उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे जल्लोषात भूमिपूजन करण्यात आले. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, मेर्दीचे सरपंच पांडुरंग दरवडा, कालंभाडच्या सरपंच अनुसया वाघ आदींची उपस्थिती होती.