Wed, Feb 1, 2023

टिळकनगर विद्यामंदिर शाळेचा सुवर्ण महोत्सव
टिळकनगर विद्यामंदिर शाळेचा सुवर्ण महोत्सव
Published on : 9 January 2023, 12:07 pm
डोंबिवली, ता. ९ (बातमीदार) : टिळकनगर विद्यामंदिर शाळेचा सुवर्णमहोत्सव समारंभ उत्साहात पार पडला. या सुवर्णमहोत्सवी संमेलनात डोंबिवली, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे, नागपूर, उत्तर प्रदेश, बेंगलोर आदी ठिकाणांहून माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. हास्य जल्लोष या एकपात्री कार्यक्रमानंतर दुसऱ्या सत्रात शास्त्रीय संगीत, लावणी, सुगम संगीत, हिंदी चित्रपट गीते, गझल सादर करण्यात आली. या महोत्सवाचे नियोजन मेधा केणे, स्मिता कुलकर्णी, सुहास देशपांडे, मोहन देशपांडे, शोभा जोशी, शरद नाझीरकर, सुभाष रणदिवे व सुधीर बर्डे यांनी केले होते.