श्वानाच्या तोंडाला बांधला सुतळीबॉम्ब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्वानाच्या तोंडाला बांधला सुतळीबॉम्ब
श्वानाच्या तोंडाला बांधला सुतळीबॉम्ब

श्वानाच्या तोंडाला बांधला सुतळीबॉम्ब

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कांदिवली रेल्वेस्थानकाजवळ भटक्या कुत्र्याच्या तोंडाला सुतळी बॉम्ब बांधून त्याचा स्फोट केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. कांदिवली रेल्वेस्थानकाभोवती बसवण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने रेल्वे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. कांदिवलीच्या अशोक नगरमध्ये राहणाऱ्या प्राणिप्रेमी अनुराधा कदम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अनुराधा कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या भावाने कुत्रा जखमी अवस्थेत पाहिला. अनुराधा यांच्या भावाने नंतर सर्व हकीकत अनुराधा कदम यांना सांगितली. अखेरीस त्यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार नोंदवली. कांदिवली पोलिस रेल्वेस्थानक आणि परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरे तपासत आहेत.