सरळगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरळगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन
सरळगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन

सरळगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन

sakal_logo
By

मुरबाड, ता. १० (बातमीदार) : सरळगाव ग्रामपंचायत क्षेत्रात कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी घंटागाडीची आवश्यकता होती. ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या ही अडचण लक्षात येताच, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून घंटागाडी मंजूर करण्यात आली. या घंटागाडीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. सरळगावमधील गणेशनगर येथे जिल्हा परिषदेमार्फत गटारांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचेही भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सरळगाव येथील प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमांसाठी बांधण्यात आलेल्या शेडचेही उद्‍घाटन करण्यात आले. लिहाचा पाडा गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचेही उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. या रस्त्यामुळे ग्रामस्थांचा प्रवास सुकर होणार आहे. या वेळी शिवसेना मुरबाड तालुकाप्रमुख कांतिलाल कंटे, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखाताई कंटे, सरळगावचे सरपंच मधुकर घुडे, उपसरपंच विठ्ठल देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.