देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान
देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान

देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचल्यामुळेच स्त्रियांना विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करणे शक्य झाले आहे. स्त्रियांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळण्याचे श्रेय नक्कीच त्यांना आहे. तसेच देशाच्या प्रगतीसाठी सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे समान योगदान असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलिस उपायुक्त तथा सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी केले.
सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने नुकतीच सिडको भवन येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी महिलांमध्ये त्यांच्या हक्काविषयी जागृती करणे, हेच सावित्रीबाईंना खरे अभिवादन ठरेल, असे मत पेण परिसरातील आदिवासी महिलांकरिता काम करत असलेल्या मंजुळा पाटील यांनी व्यक्त केले; तर सिडको युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी स्त्रियांच्या उन्नतीकरिता सावित्रीबाईंचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले.
---------------------------------------
महिलांच्या कार्याचा गौरव
सिडको महामंडळामध्ये व सिडकोबाहेरील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात सिडकोच्या मुख्य अभियंता शीला करुणाकरन, सहायक कार्यकारी अभियंता किरण राजूरकर, साकव पेण प्रकल्पाच्या महिला संघटक मंजुळाताई पाटील, सामाजिक कार्यकर्त्या रिचा समीत यांचा समावेश होता. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांनादेखील पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.