बस थांब्याची गैरसोयीतून मुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस थांब्याची गैरसोयीतून मुक्ती
बस थांब्याची गैरसोयीतून मुक्ती

बस थांब्याची गैरसोयीतून मुक्ती

sakal_logo
By

घणसोली, ता. १० (बातमीदार)ः नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी बस थांब्याची सध्या दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांचा दैनंदिन प्रवास कटकटीचा झाला आहे. अशातच ऐरोली, सेक्टर ४ येथील अभंग सोसायटीजवळच्या बस स्थानकावर बाकडेच नसल्याने प्रवाशाची मोठी गैरसोय होत होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्याने परिवहन विभागाने नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली आहे.
सुनियोजित शहर असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरामदायी प्रवासासाठी एनएमएमटीने विविध ठिकाणी बस थांबे उपलब्ध करून दिले आहेत; मात्र यातील अनेक बस थांब्यांची सध्या दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी बस थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना ऊन-पावसातच बसची वाट पाहण्याची वेळ आली होती; तर काही ठिकाणी बस थांबे दारूचे अड्डे बनले आहेत. काही दिवसांपूर्वी ऐरोली सेक्टर ४ येथील अभंग सोसायटीजवळील बस थांब्याचीदेखील काहीशी अशीच परिस्थिती होती. येथे प्रवाशांच्या बसण्यासाठी बाकडेच नसल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची व्यथा ‘सकाळ’ने मांडली होती. त्याची दखल घेत परिवहन विभागाने तत्काळ येथे बसण्यासाठीची आसनव्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रवाशांची त्रासातून सुटका झाली आहे.
--------------------------------------
ऐरोली, सेक्टर ४ येथील अभंग सोसायटी या ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असलेल्या बाकड्यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला माहिती दिली आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी येथे नवीन आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
- योगेश कडुस्कर, परिवहन व्यवस्थापक, नवी मुंबई
--------------------------------------
ऐरोली, सेक्टर ४ येथील अभंग सोसायटी या बस थांब्यावरील आसनव्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते. मात्र, आता परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन बाकडे पुन्हा एकदा बसल्याने गैरसोय दूर झाली आहे.
- मनीष टाळे, प्रवासी