एफआरपी शीटची बेकायदा विल्हेवाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एफआरपी शीटची बेकायदा विल्हेवाट
एफआरपी शीटची बेकायदा विल्हेवाट

एफआरपी शीटची बेकायदा विल्हेवाट

sakal_logo
By

मनोर, ता. १० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कुडे गावच्या हद्दीत ड्रीम हॉटेलच्या मागच्या बाजूस साठवून ठेवलेल्या एफआरपी शीटचा साठा जाळून नष्ट करण्यात आला. रविवारी सायंकाळी एफआरपी शीटचा साठा बेकायदा जाळल्याने मोठ्या प्रमाणात काळा धूर निर्माण होऊन परिसर प्रदूषित झाला होता. काळ्या धुराचे लोळ चार ते पाच किलोमीटर अंतरावरून दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.
सातिवली गावच्या हद्दीतील महामार्गालगतच्या फायबरच्या शीटपासून स्लाईड तयार करणाऱ्या कारखान्यातील वेस्टेज एफआरपी शीटचा साठा कुडे गावच्या हद्दीत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एफआरपी शीटच्या वेस्टेजची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट न लावता, उघड्यावर जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. वर्षभरापूर्वी हलोली गावच्या हद्दीत साठा केलेल्या एफआरपी शीट जाळून नष्ट करण्यात आल्या होत्या. महामार्गालगत उघड्यावर एफआरपी शीट जाळून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण केले जात आहे.

----------------
२०१९ ची पुनरावृत्ती
पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या एफआरपी शीटचा बेकायदा साठा, विल्हेवाट लावणारा कारखाना आणि हस्तकांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. मार्च २०१९ मध्ये महामार्गावरील सातिवली गावच्या हद्दीतील एफआरपी शीट तयार करणाऱ्या सिनर्जी वाटर पार्क राईड कारखान्यातील ज्वलनशील एफआरपी शीटला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर निर्माण झाला होता.

-----------
तक्रार मिळाल्यानंतर एफआरपी शीटपासून स्लायडिंग तयार करणाऱ्या कारखान्याला भेट दिली जाईल. प्रकरणाची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- वीरेंद्र सिंग, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर