Tue, Jan 31, 2023

सोळा तासानंतर विहिरीचे पाणी आटवून बाहेर काढला मृतदेह
सोळा तासानंतर विहिरीचे पाणी आटवून बाहेर काढला मृतदेह
Published on : 10 January 2023, 1:26 am
मनोर, ता. १० (बातमीदार) : विहिरीत पोहताना बुडालेल्या तरुणाचा मृतदेह १६ तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. अखिलेश प्रदीप जैस्वाल (वय २३) हा सौरभ सिंग, अतुल, आकाश बैरागी आणि अभिषेक मोर्या या मित्रांसोबत रविवारी (ता. ८) सकाळी बोईसरजवळील पास्थळ गावातील पडीक विहिरीत पोहण्यासाठी गेला होता; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला होता. त्याच्या मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अपयश आल्याने पाचमार्ग पोलिस आणि तारापूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर तीन पंपांच्या साह्याने विहिरीतील पाणी उपसून काढले. अखेर सोळा तासांच्या प्रयत्नांनंतर अखिलेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.