महापालिका भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका भूखंडावरील
अनधिकृत बांधकामावर हातोडा
महापालिका भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा

महापालिका भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : मुंबई महापालिकेच्या मालाड पश्चिमेला वनराई परिसरात पालिकेच्या मालकीच्या खुल्या प्लॉटमध्ये घरे तयार करून भाड्याने देण्यात आली होती. तसेच ही घरे एसआरए प्रकल्पात दाखवण्याचा स्थानिक विकसकाचा डाव उघडकीस आल्यानंतर महापालिकेने या बांधकामावर हातोडा मारला. एकूण ७० अनधिकृत घरांवर पालिकेच्या पी नॉर्थ विभागाकडून कारवाई करण्यात आली.
नाले विस्तारीकरणाच्या कामामध्ये बाधित होणाऱ्यांसाठी हा प्लॉट राखीव ठेवण्यात आला होता; परंतु या प्लॉटवर अतिक्रमण करून या ठिकाणी घरे भाड्याने देण्यात आली होती. पालिकेच्या टीमकडून या बांधकामावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी नाल्यातही वाढीव भर घालून हा प्लॉट अतिक्रमण केल्यामुळेच पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५० कर्मचाऱ्यांच्या टीमने काम केले. कारवाईसाठी ४४ पोलिसांचाही बंदोबस्त होता. या कारवाईत ७० अनधिकृतपणे बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यात आली. ही बांधकामे हटवतानाच १० झोपड्याही जमीनदोस्त करण्यात आल्या.
...
कचरा विलगीकरण केंद्र स्थापणार
या ठिकाणी दिवसेंदिवस झोपड्यांची संख्या वाढवून नालाही बुजवण्याचा प्रकार सुरू झाला होता; परंतु आता ही ८० हजार चौरस मीटरची जागा कारवाईमुळे मोकळी झाली आहे. या ठिकाणी कचरा विलगीकरण केंद्राची स्थापना पालिकेकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पालिकेच्या ताब्यातील हा मोठा भूखंड मोकळा होतानाच नाल्यात भरणा करण्याचाही प्रकार थांबला आहे.