वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले
वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले

वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले

sakal_logo
By

नवीन पनवेल ता.१० (वार्ताहर)ः केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा आणला आहे. या कायद्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत वाढ केली. त्यामुळे पनवेल परिसरातील २७३४ वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उंल्लघन चांगलेच महागात पडले आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहनने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यात
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार झालेल्या वाहतुकीच्या नियमांमधील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन कायद्यानुसार बेशिस्त वाहनचालकांवर लावण्यात येणारा दंड तसेच चालक परवाने निलंबित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये पनवेलमध्ये २,३५० एवढ्या विक्रमी वाहन परवाने निलंबित करण्यात आले होते. तर २०२२ मध्ये पनवेल प्रादेशिक परिवहनने आत्तापर्यंत २,७३४ वाहन परवाने निलंबित केले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांची या धडक कारवाईमुळे विना परवाना वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.
-------------------------------------
वाहनपरवाना काढण्यासाठी धावाधाव
वाहनचालक परवाना काढण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहनकडे धाव घेतली आहे. त्यामुळे नवीन परवाने काढण्यासाठी आगाऊ स्लॅाट बुक केले जात आहेत. त्यामुळे पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या वाहन परवाना काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे.
------------------------------
राज्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासोबत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिस, आरटीओमार्फत ही कारवाई केली जात आहे. अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम तोडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.
-गजानन ठोंबरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल
------------------------
सिग्नल जंप - १,३५४
मोबाईल टॅाकिंग - ४३१
ड्रिंक ड्राईव्ह - ३२
ओव्हर स्पीड - ७३५
विनाहेल्मेट - १८२