दोन लाखांच्या ऐवजाची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन लाखांच्या ऐवजाची चोरी
दोन लाखांच्या ऐवजाची चोरी

दोन लाखांच्या ऐवजाची चोरी

sakal_logo
By

जुईनगर, ता. ११ (बातमीदार)ः वाशी सेक्टर १६ येथील बी २ टाईपमधील कामिनी गोस्वामी यांच्या घरात झालेल्या चोरीत दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे घरफोडीची घटना वाशीत घडली होती. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
वाशी सेक्टर १६ बी २ मध्ये राहणाऱ्या कामिनी गोस्वामी यांच्या घरी सोमवारी पहाटे चोरी झाली आहे. या घटनेत घरातील सर्वजण पहिल्या मजल्यावर झोपले असून तळ मजल्यावरील ऐवज चोरीला गेला आहे. साधारण ३ वाजून १५ मिनिटांनी घरात चोर शिरल्याचे सीसी टीव्हीमध्ये दिसून येत आहे. यावेळी चोरांनी घरातील एक लाख ८९ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले असून याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वाशी परिसरात सातत्याने घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.